France: नवीन विधेयकाच्याविरोधात फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनियामध्ये उसळली दंगल; आणीबाणी जाहीर

फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये नवीन विधेयकावर खासदारांनी सहमती दर्शवल्यानंतर देशापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या न्यू कॅलेडोनियामध्ये दंगल उसळली. न्यू कॅडेलोनिया हा ऑस्ट्रेलियाजवळचा प्रदेश आहे, ज्यावर फ्रान्सचे राज्य आहे.

पॅरिसमध्ये मंजूर झालेल्या नवीन विधेयकानुसार, 10 वर्षांपासून न्यू कॅलेडोनियामध्ये राहणाऱ्या फ्रेंच रहिवाशांना प्रांतीय निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. या निर्णयामुळे मूळ रहिवाशांच्या (कनक) मतांचे महत्त्व कमी होईल, अशी भीती काही स्थानिक नेत्यांना वाटते. या विधेयकावरून गेल्या तीन दिवसांपासून न्यू कॅलेडोनियामध्ये हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, न्यू कॅलेडोनियाच्या दोन विमानतळ आणि बंदरांच्या सुरक्षेसाठी सशस्त्र दल तैनात करण्यात आले आहे, असे गुरुवारी सकाळी फ्रान्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या हिंसक दंगलीत चार जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने आणीबाणी जाहीर केली.

फ्रेंच उच्चायुक्त लुई ले फ्रँक यांनी सांगितलं की, जेंडरम्सला तीन नगरपालिकांमध्ये पाच हजार आंदोलकांचा सामना करावा लागला, त्यापैकी तीन ते चार हजार राजधानी नौमिया येथील होते. ते पुढे म्हणाले, ‘दोनशे लोकांना अटक करण्यात आली. 64 जणांसह अनेक पोलीस जखमी झाले’.

फ्रान्समध्ये आणीबाणीची घोषणा

फ्रान्सने न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी जाहीर केली. आंदोलकांनी अनेक वाहनांची जाळपोळ केली. यासोबतच अनेक दुकानेही लुटली. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना नौमियाचे रहिवासी योन फ्ल्युरोट म्हणाले की त्यांनी लूटमार होताना पाहिली. काही दुकानमालक स्वत:च्या मर्जीने छापे टाकण्यास परवानगी देत​आहेत. दुकानाचे नुकसान करू नये, अशी विनंती करतात. या हिंसाचारात तीन तरुण कनकांचा मृत्यू झाला. एका 24 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागल्याने आपला जीव गमवावा लागला.
पुढील 12 दिवस परिसरात आणीबाणीची स्थिती कायम राहणार आहे. प्रशासनाने Tik-Tok व्हिडिओ ॲपवरही बंदी घातली आहे.

फ्रान्सने 1853 मध्ये खनिज समृद्ध न्यू कॅलेडोनियाचा ताबा घेतला होता. तेथील रहिवाशांना 1957 मध्ये फ्रेंच नागरिकत्व देण्यात आले. वृत्तानुसार, येथील कनक आणि युरोपीय लोकांमध्ये अनेक दिवसांपासून तणाव सुरू आहे.