आरोग्य- आयुर्वेद आणि मधुमेह

>> वैद्य चंद्रकुमार देशमुख

 

मधुमेह आपल्या शरीराला पोखरतो. रक्तातील साखर वाढण्याचा हा आजार एकदा जडला की इतर सगळ्या व्याधी आपोआपच शरीराची पकड घेतात. यासाठी आधीपासूनच आहारविहारातील पथ्ये पाळायला हवीत. आयुर्वेदाची मूळ मांडणी ही रक्तातील साखर वाढू नये यासाठीच आहे. मधुमेह होऊ नये आणि झाल्यास काय करावे याची माहिती घेत हा आजार शक्य तितका दूर राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत.

ला रे आला, मधुमेह आला…आता कसं होणार माझं? लागली शुगर आता मला… आता डोळे जाणार, किडनी जाणार, मी मरणार…सगळंच संपले रे बाबा… बाप रे, केवढी ती शुगर… अगदी 400 च्या पार… काही केल्या कमी होईना… दीक्षित डाएट करावा का? नाही नाही, मला भूकच सहन नाही होत. त्या बाबांचे चूर्ण घेऊ का… म्हणजे शुगर कमी होईल.

‘अहो, तो कसला तरी ज्यूस आलाय म्हणे…लई गुण त्यात बघा!’

‘नाही हो, आम्ही तर तो हिरवा चहा पितो… नाही नाही, मी तर 55 मिनिटांत खातो आणि काहीही खातो बरं का!’

‘जाऊ दे रे, सकाळी सकाळी एक ग्लास कडुनिंब रस घे म्हणजे तुझ्या लेकराचीदेखील शुगर जाईल…’

‘नाही रे, पनीर फूल आणि दररोज मेथी दाणे खाणे म्हणजे शुगर जाणे!’

‘नाही रे, ते सकाळी सकाळी केशरीबाबाने सांगितलेला ‘फुसफुस’ प्राणायाम कर म्हणजे शुगर फूस होऊन जाईल!’

अशी ही सगळी जाहिरातबाजीची वक्तव्ये रक्तातील साखर वाढलेल्या व्यक्ती आजूबाजूला अनुभवतच असतात आणि परत परत तीच तीच रक्तातील साखर नियंत्रणात आणण्याचा अट्टहास करतात. रक्तातील साखर वाढलेले लोक रक्तातील साखर कमी करणारी औषधे घेऊनसुद्धा रक्तातील साखर वाढल्यावर जे दुष्परिणाम होतात त्यानेच मरतात. त्यातल्या त्यात तर आता रक्तातील साखर हग्त् (शून्य) करण्याचे प्रोग्राम सोशल मीडियावर सुरू झालेत आणि भोळीभाबडी जनता ते पाळतेय. तर अशा सर्व लोकांची साखरेने चिकट झालेली दृष्टी ठीक करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

आयुर्वेदातील मधुमेह आणि तुमची साखर

प्रथम आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि यात आलेल्या गोष्टी या सूत्र स्वरूपात असतात. सूत्र म्हणजे सत्य, जसे सकाळी-जेवल्यावर शरीरात कफ वाढतो हे एक सूत्र आहे. मग 500 वर्षांपूर्वी व इथूनही पुढे 500 वर्षं जेवल्यावरही कफ वाढणारच आहे. जेवल्यावर रक्ताता साखर वाढी दिसते. आयुर्वेदात असा एकही आजार लिहिलेला नाही की, हा रक्तातील साखर वाढणारा आजार आहे.

आयुर्वेदात प्रमेह नावाचा आजार आहे आणि याचे 20 प्रकार आहे. प्रमेह म्हणजे ज्या व्यक्तीचे मूत्राचे प्रमाण वाढले आहे. मग त्या लघवीच्या रंग व स्वरूपावरूनही 20 प्रकार आहेत. यातील एकाही प्रकारात रक्तातील साखर वाढते असे वर्णन नाही. त्यातील जे चार प्रकार आहेत त्यातील मधुमेह नावाचा प्रकार कष्टाने बरा होणारा आहे व यातदेखील रक्तात साखर न वाढता लघवीला मुंग्या लागतात असे वर्णन आहे. बाकी यात अशी लक्षणे दिली आहेत, ज्यात शरीराच्या धातूंचे नुकसान व शरीर इतर आजारांचे घर बनणे असे आहे. याच आजाराला लोक रक्तातील साखर असलेला डाएबिटीस समजून बसले आहेत.

आजचा डाएबिटीस खऱया आयुर्वेदात काय आहे?

आजचा डाएबिटीस म्हणजे, रक्तातील साखर उपाशी आणि खाल्ल्यानंतर तपासणे व एचबीएवनसी रिपोर्टमध्ये तीन महिन्यांची साखर असते ते पाहून निदान करणे व औषधे खात राहणे. म्हणजे रिपोर्ट पाहून औषधी व इन्सुािन देणे. यात इतकी प्रगती झालेली आहे की, अगदी त्वचेमध्ये dान्ग्म ज्त्aहू करून ते मोबाइा आपला कनेक्ट करून पाहता येते. त्या रिपोर्टनुसार दररोज उरलेले आयुष्य औषधे घेत राहणे. नेमके यालाच कंटाळलेले लोक आयुर्वेदाकडे पर्याय म्हणून पाहतात.

लोक तपासण्या व रक्तातील साखरेला केंद्रबिंदू मानून आयुर्वेदात औषधी पाहण्यात मग्न होतात. भर पडते सोशल मीडियाची. जिथे अगदी सुंदर विवेचन करणारी, परंतु पुरेसे ज्ञान नसणारी व्यक्ती जी रक्तातील साखरेला केंद्र करून कसलेही कधीही न तपासलेली औषधी, ज्यूस, काढा, चूर्णासारखी औषधी विकायला सुरुवात करते.

आजचा तुमचा डाएबिटीस हा आयुर्वेदामधील प्रमेह/मधुमेह नाही बरं का. तुमची रक्तातील साखर म्हणजे डाएबिटीस – हा आयुर्वेदातील ज्वर (मुरलेला ताप), सन्निपात ज्वर, ग्रहणी (पचन बिघडलेला आजार), क्षय (शरीर थकून जाणे), मानसिक ताण, जुना मूळव्याध असा कोणताही आजार असू शकतो.म्हणून तुमच्या डाएबिटीसचे आयुर्वेदीय निदान हे वेगळेच असते. त्यामुळेच वेगळे निदान असेल तर त्या आजाराची चिकित्सादेखील वेगळीच असायला हवी. कडू औषधी खाऊन, कडूनिंब रस, ज्यूस पिऊन, कारले, मेथी बिया, पनीर फूल खाऊन कोणाचाच डाएबिटीस जात नाही. गोड खाणे बंद केले तरी साखर वाढते आणि गोड खाऊनही साखर नियंत्रणात राहते.

आयुर्वेद चिकित्सा करताना तशी पदवी असणाऱया व्यक्तीलाच विचारून करावी. नाहीतर कडू रुक्ष कोरडे पदार्थ आयुर्वेदाच्या नावाखाली खपतील, पण उपयोग नाही होणार. कारण तुमच्या डाएबिटीसचे आयुर्वेदीय निदान हे वेगळे आहे आणि त्यानुसारच चिकित्सा घ्यावी. उरला प्रश्न रक्तातील साखरेचा. कच्चा आंबा आंबट असतो. त्याला उष्ण आणि काळाचा स्पर्श झाला असता गोड होतो. मूलत रक्ताची चव तिखट आहे आणि ते डाएबिटीस मध्ये गोड होते. निसर्गात मिरची ही तिखट असते आणि मिरचीला कितीही गरम करा, ती गोड होत नाही. मिरची आपला तिखटपणा खराब झाल्यावरच सोडते आणि गोड होते. तुमचे रक्त गोड झाले म्हणजे तुमच्या शरीराचा नाश होण्यास सुरुवात आहे. शरीर सांगत आहे- व्यायाम करा. रोज वेळेवर जेवा. आजाराचे मुख्य कारण शोधा. शरीराला खराब करणारे जागरण, बाह्य पदार्थ, फास्ट लाइफला ब्रेक द्या. नियमात रहा, निसर्गाला अनुसरून रहा. आयुर्वेदाचे  सिद्धांत पाळत रहा आणि आजार होण्यापूर्वीच सावध व्हा.

z [email protected]