शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच, चंद्रपुरात नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्यानं संपवलं जीवन

महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे सत्र सुरुच चंद्रपुरातील एका तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून कीटकनाशक पिऊन मृत्युला कवटाळले. पृथ्वीराज रामा मालखेडे (वय – 43) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून ते राजुरा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीराज मालखेडे यांच्या मुलीचा महिन्याभरापूर्वी विवाहसोहळा पार पडला. या विवाहसोहळ्यासाठी त्यांनी बचत गटातून हातउसनवारी पैसे घेतले होते. मात्र सततची नापिकी, मुलीच्या लग्नाच्या कर्जाचा डोंगर आणि कर्ज फेडायची चिंता यामुळे व्यथित झालेल्या पृथ्वीराज यांनी कपाशीवर फवारणीसाठी आणलेले कीटकनाशक प्यायले. याची माहिती मिळताच शेजाऱ्यापाजाऱ्यांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महिनाभरात राज्यात 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काळजीवाहू सरकारला बळीराजाची काळजी नाही