हिंदुस्थानचा सराव सामना बांगलादेशविरुद्ध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरू होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेपुर्वी हिंदुस्थानी संघ बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार असून आयसीसीने त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 1 जून रोजी हिंदुस्थान बांगलादेशबरोबर सराव सामना खेळणार आहे, मात्र हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात एकही सराव सामना होणार नाही. त्यामुळे हे कट्टर प्रतिस्पर्धी थेट 9 जून रोजी एकमेकांविरुद्ध मैदानात उभे ठाकणार आहेत.

आयपीएलचे पर्व अंतिम टप्यात आलेले असताना क्रिकेटप्रेमींना वेध लागले आहेत ते आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे. 2 जूनपासून सुरू होणाऱया या स्पर्धेसाठी सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले असून विश्वचषकाची तयारीही सुरू केली आहे. विश्वचषकापूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात ट्वेंटी-20 मालिका होत असल्याने हे संघ सराव सामने खेळणार नाहीत. 27 मे पासून सराव सामन्यांना सुरुवात होणार आहे. सलामीचा सराव सामना सामना पॅनडा आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.

विश्वचषकातील सराव सामने

पॅनडा विरुद्ध नेपाळ, ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, नामिबिया विरुद्ध युंगाडा. 28 मे ः श्रीलंका विरुद्ध नेदरलॅण्ड्स, बांगलादेश विद्ध अमेरिका, ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया. 29 मे ः दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंट्रा-स्क्वाड, अफगाणिस्तान विरुद्ध ओमान. 30 मे ः नेपाळ विरुद्ध अमेरिका, स्का@टलंड विरुद्ध युगांडा, नेदलॅण्ड्स विरुद्ध पॅनडा, नामिबिया विरुद्ध पापुआ न्यू गिनी, वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 31 मे ः आयर्लंड विरुद्ध श्रीलंका, स्का@टलंड विरुद्ध अफगाणिस्तान. 1 जून ः बांगलादेश विरुद्ध हिंदुस्थान.