Photo – शिवसेनेची मुंबईकरांना दिवाळी भेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेच्या वतीने मुंबईकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमांअंतर्गत शिवसेनेकडून नागरिकांना दिवाळी भेटवस्तू, दिवाळी साहित्य वाटप व उटण्याचे वाटप करण्यात आले. शिवसेनेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

शिवसेना समन्वयक योगेश पेडणेकर यांच्यातर्फे विभागातील नागरिकांना सुगंधित उटण्याचे वाटप करण्यात आले. शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाबा कदम, नगरसेविका श्वेता पावसकर, दीपक सावंत, संदीप सावंत, रवींद्र महाडिक, रजनी पाटील, मोहिनी कुडकर, अल्पिता वारंग, सचिन चोरमुले, रामप्रसाद गुप्ता, किशोर कांबळे आदी उपस्थित होते.

अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक तथा रायगड जिल्हा संपर्कप्रमुख संजय मानाजी कदम यांच्या वतीने डी.एन.नगर येथे भव्य स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शिवसेना नेते, आमदार ऍड. अनिल परब यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना दिवाळी भेट व सुगंधित उटण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना उपनेते अमोल कीर्तिकर, विभाग संघटिका अनिता बागवे, कुणाल जाधव आदी उपस्थित होते.

शिवसेना शाखा क्र. 173 च्या वतीने प्रभागातील नागरिकांना सुगंधित उटणे व पणत्या वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे, विभाग संघटक पद्मा शिंदे, विधानसभा प्रमुख गोपाळ शेलार, प्रणिता वाघधरे, गजानन पाटील, प्रभाकर भोगले, प्रीतम निंबाळकर, शारदा गोळे, संजय कदम, वासंती दगडे, राजु आंबेरकर, प्रमोद महाबळ आदी उपस्थित होते.

शिवसेना मलबार हिल विधानसभा व सिंह गर्जना सेवा मंडळ (बाबुलनाथ) यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी फराळ साहित्याचे वाटप करण्यात आले. सह समन्वय प्रकाश मिसाळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शिवसेना उपनेते अरूण दुधवडकर, विभाग प्रमुख संतोष शिंदे, उप संघटक वर्षा साबळे, राजेंद्र गायकवाड, योगिता पेंढारकर, बाळा फोपे, गणेश लांबोरे, सतीश जाधव, शशिकांत सावंत, प्रविण देटे, शैलेश गोलवसकर आदी उपस्थित होते.