मुलांचा स्क्रीनटाईम कमी करा

वाढत्या स्क्रीनटाईममुळे मुलांच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होते. परिणामी त्यांचे स्मरण कमी होते. 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर याचा जास्त परिणाम होतो.

अमेरिका येथील सिनसिनाटी युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, मुले जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवू लागली तर खेळ, व्यायाम, गाठीभेटी, संवाद अशा गोष्टींसाठी वेळ देत नाहीत. याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर होतो.

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर सोशल मीडियावर प्रतिबंध घालणारा कायदा करण्यात आलाय. ब्रिटन सरकारही 16 वर्षांहून कमी वयाच्या मुलांना मोबाईल विक्री बंदी करण्याचा विचार करत आहे. सध्याच्या काळात  मुले खेळांपासून दूर जात असून जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर गेम खेळण्यात घालवत आहे. केवळ मुलेच नव्हे तर मोठय़ांचाही स्क्रीनटाईम वाढला आहे.

– जगभरातील पालक मुलांच्या वाढत्या स्क्रीनटाईममुळे चिंताग्रस्त आहेत. ब्रिटनमध्ये तर 12 वर्षे वयाच्या प्रत्येक मुलाकडे मोबाईल आहे. ते अधिकतर वेळ सोशल मीडियावरच घालवतात. परिणामी काही मुले अबोल तर काही आक्रमक होतात. संवेदनशील विचार कमी होतात. लठ्ठपणा, निद्रानाश, चिंता यांची शक्यता वाढते.

– 2 ते 12 वर्षे वयाच्या मुलांच्या हाती 24 तासांपैकी एकच तास मोबाईल देणे योग्य. 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना दोन तासच मोबाईल द्यावा. त्यामुळे दुष्पपरिणाम टाळता येतील.

– वयस्कर लोकांसाठीही स्क्रीनटाईम कमी करणे फायद्याचे ठरते.