Photo – आलिया भट्टने मेट गालाच्या रेड कार्पेटवर लावले चार चाँद, पेस्टल रंगाच्या लेहेंगा साडीत दिसली सुंदर

सिनेइंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या फॅशन इव्हेण्टपैकी ‘मेट गाला’ हा एक आहे. हा इव्हेण्ट सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या इव्हेण्टमध्ये हॉलीवूडपासून बॉलीवूडपर्यंतच्या कलाकारांनी आपल्या फॅशनने रेड कार्पेटवर चार चाँद लावले. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावर्षी ‘मेट गाला’चा न्यूयॉर्क शहराच्या मेट्रोपॉलिटन म्युझिअम ऑफ आर्टमध्ये आयोजित केला होता. अनेक आंतरराष्ट्रीय इव्हेण्ट्समध्ये हिंदुस्थानी पोशाखात दिसलेली आलिया भट्ट यावेळी ‘मेटा गाला’ इव्हेण्टमध्येही हिंदुस्थानी पोशाखात दिसली. यावेळी ‘मेटा गाला’ थीम स्लीपिंग ब्यूटीज रीअवेकनिंग आहे. या दरम्यान आलियाने पेस्टल रंगाच्या लेहेंगा साडीत दिसली. इंडियन डिझायनर सब्यासाचीने आलिया भट्ट हिची साडी डिझाईन केली, आलियाच्या साडीचा पदराला सोनेरी धाग्यांनी काम केलेली फूले होती. साडीवर लावण्यात आलेले गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या फुलांसोबत हिरव्या रंगाच्या पानांनी हायलाईट केले आहे आणि लेहेंगा साडीला छोट्या छोट्या फुलांनी सजवले आहे. आलियाने चेहऱ्यावर मिनीमल मेकअप केला असून ती खूप सुंदर दिसत आहे. आलिया हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.