सलमान खान घरासमोरील गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर झालेल्या गोळीबारप्रकरणी नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई क्राईम ब्रान्चला आता या प्रकरणातील पाचव्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे.

सलमान खानच्या वांद्रे यथील घराबाहेर झाल्लेल्या गोळीबाराप्रकरणी पोलिसांना पाचवा आरोपी पकडण्यात यश आले आहे. मुंबईच्या क्राईम ब्रान्च पथकाने एका आणखी संशयिताला अटक केली आहे. या व्यक्तीला राजस्थान येथून अटक केली असून मोहम्मद चौधरी असे त्याचे नाव आहे. मोहम्मद चौधरी याच्यावर आरोप आहे की, त्याने या प्रकरणात विक्की गुप्ता आणि सागर पाल या दोन शूटर्सना मदत केली होती.

सलमान खान घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात आरोपी अनुज थापन याने आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी आत्महत्या नसल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, पोलीस कोठडीतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा योग्य पद्धतीने तपास व्हायला हवा. त्याच्या कुटुंबियांनी ही त्याने आत्महत्या केली यावर विश्वास नाही, या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई आणि त्यांच्या गॅंगचे नाव समोर आले आहे तर लॉरेन्स बिश्नोईच्या लहान भाऊ अनमोल बिश्नोई याने या प्रकरणाची जबाबदारी घेतली आहे.