बफेंकडे रोख रकमेचा ढीग

शेअर बाजारातील ‘बिग बुल’ वॉरेन बफे यांच्या तिजोरीत एवढी नगद जमा झालेय की, ती खर्च करणे त्यांना शक्य होत नाहीय. रोख रकमेचा हा डोंगर वाढत चालला असून त्यांच्याकडे 15 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने जानेवारी ते मार्च या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. पंपनीने 2023 या वर्षात 37.4 अब्ज डॉलरचा विक्रमी ऑपरेटिंग नफा आणि 96.2 अब्ज डॉलरचा निव्वळ नफा नोंदवला. विशेष म्हणजे पंपनीच्या रोख रकमेत सातत्याने वाढ होत असून ती 189 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. हिंदुस्थानी चलनात ही रक्कम अंदाजे 15.76 लाख कोटी रुपये आहे.