सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास लांबणीवर

हिंदुस्थानी वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा अंतराळ प्रवास लांबणीवर पडला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठी बोइंगची स्टार लायनर मोहीम पुढे ढकलण्यात आल्याने हा प्रवास लांबणीवर पडला आहे. मंगळवारी सकाळी 8.04 वा. फ्लोरिडा येथील केप पॅनाव्हरल स्पेस पर्ह्स स्टेशनवरून यूएलएच्या अॅटलस व्ही रॉकेटमधून प्रक्षेपित होणार होते. रॉकेटमधील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. मिशन पुढे ढकलल्यानंतर अंतराळवीर क्रू क्वार्टरमध्ये परतले आहेत.