पुण्यात भरधाव पोर्शेने दोघांना चिरडले, तरुण तरुणीचा जागीच मृत्यू

पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे गाडीने दोन तरुणांना चिरडलं आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अनिस अवधिया व मैत्रीण अश्विनी कोस्टा अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एका 17 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे.

अनिस अवधिया हा दोन दिवसांपूर्वीच परदेशातून पुण्यात आला होता. मिंत्रासोबत पार्टी करण्यासाठी तो कल्याणीनगर येथील बॉलर हॉटेल येथे आला होता. रात्री अडीचच्या सुमारास ते सर्व परत जात असताना एअरपोर्ट रोडवर ग्रे कलरच्या गाडीने दोन्ही बाजूस नंबरप्लेट नसलेल्या पोर्शे कारने अनिस व अश्विनीला मागून धडक दिली. या घडकेत दोघांचाही मृत्यू झाला.

हा अपघात एवढा भयंकर होता की आजूबाजूच्या वस्तीतले देखील नागरिक रस्त्यावर धावत आले. लोकांना पाहून वेदांतने पळून जायचा प्रयत्न केला. मात्र त्याला नागरिकांनी भररस्त्यात अडवून धरलं आणि रस्त्यातच त्याला मारायला सुरुवात केली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि नागरिकांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.