… तर अशी शिक्षा करू की संविधानाच्या शपथेचा अवमान करण्यापूर्वी दहा वेळा विचार कराल, राहुल गांधी यांचा इशारा

उत्तर प्रदेशमध्ये एका तरुणाचा भाजपला आठ वेळा मतदान केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून सध्या विरोधकांनी भाजपला जोरदार फटकारले असून याप्रकरणी निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या व्हिडीओवरून राहुल गांधी यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.

”आपला पराभव समोर बघून भाजप जनादेशाला डावलण्यासाठी सरकारी यंत्रणांवर तबाव टाकूीन लोकशाहूला लुटायचा प्रयत्न करत आहे. सर्व निवडणूक अधिकारी त्यांची संविधानिक जबाबदारी विसरणार नाहीत अशी काँग्रेस त्यांच्याकडून अपेक्षा करते. नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार बनताच अशी शिक्षा करू की यापुढे कोणी संविधानाच्या शपथेचा अवमान करण्याआधी 10 वेळा विचार करेल”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.