यंदाच्या निवडणुकीत ‘ हे ‘ सेलिब्रिटी राहणार मतदानापासून वंचित; वाचा काय आहे कारण

लोकसभा निवडणुक 2024 च्या पाचव्या टप्प्याचे मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. या महत्त्वाच्या टप्प्यात महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये होणार आहे. दरम्यान आत्तापर्यंत अनेक कलाकारांनी मतदानातचा हक्क बजावला आहे. यातसोबत अनेक कलाकारांनी जनतेला मतदान करण्याचे आवाहन देखील केले आहे. मात्र इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मतदान करण्यापासून वंचित आहेत. दरम्यान या कलाकारांचे मतदान न करण्यामागच नेमक कारण काय हे आपण जाणून घेऊया.

ब़ॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आहेत जे यंदा मतदान करू शकणार नाहीत. या कलाकारांच्या यादितील सर्वप्रथम नाव म्हणजे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफ. कतरिना तिच्या ब्रिटिश राष्ट्रीयत्वामुळे निवडणुकीत मतदान करू शकणार नाही. कतरिना मुळची हाँगकाँगमधली आहे. तिने तिच्या करिअरला लंडनमध्ये सुरुवात केली होती. यानंतर हिंदुस्थानात येऊन तिने कला क्षेत्रात तिची वेगळी ओळख निर्माण केली. तसेच जॅकलिन फर्नांडिसकडे श्रीलंकन नागरिकत्व आहे. तर नोरा फतेहीकडे कॅनेडियन नागरिकत्व आहे. त्यामुळे या दोघांनाही मतदान करता येणार नाही.

बॉलीवूडमधील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आलिया भट्ट. आलिया सुद्धा तिच्या ब्रिटिश नागरिकत्वामुळे निवडणुकीत मतदान करु शकत नाही. आलियाच्या आईचेदेखील ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यामुळे तिला तिच्या आईकडून वारसाहक्काने हे नागरिकत्व मिळाले आहे. तसेच सनीकडे कॅनेडियन-अमेरिकन नागरिकत्व आहे. त्यामुळे तिलाही या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या यादीत आणखी एका अभिनेत्याच्या नावाची चर्चा आहे. तो म्हणजे इम्रान खान. इम्रानचा जन्म अमेरिकेत झाला होता. दरम्याने त्याचेही अमेरिकन नागरिकत्व असल्यामुळे यंदा त्यालाही मतदान करता येणार नाही.