रत्नागिरीत अवकाळी पाऊस, मुंबई-गोवा महामार्गावर निवळी घाटात पाणी साचले

रत्नागिरी तालुक्यात आज सायंकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबई-गोवा महामार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने निवळी घाटात पाणी साचले. कडक उन्हाळ्याने हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना आज पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी साडेपाच वाजता आभाळ दाटून आलं आणि पावसाला सुरूवात झाली.मुंबई-गोवा महामार्गावर मुसळधार पाऊस पडल्याने निवळी घाटात पाणी साठले. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली.

अचानक आलेल्या पावसामुळे रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या मंडळींची भंबेरी उडाली. पाऊस सुरू होण्यापूर्वी काहीकाळ रत्नागिरी शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.रस्त्याच्या शेजारी मातीचे ढिगारे आहेत.त्यामुळे पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर साचून चिखल झाला होता.