फारुख अब्दुल्लांच्या रोड शोदरम्यान चाकूहल्ला, तीन कार्यकर्ते जखमी

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्या रोडशो दरम्यान एका व्यक्तीने चाकून कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्लात तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

जम्मू कश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील मेंढार भागात फारुख अब्दुल्ला यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार मियाँ अलताफ राजौरी यांच्यासाठी सभा घेतली व त्यानंतर रोड शो होता. या रोड़शोदरम्यान हा प्रकार घडला.