मोदींना आप संपवायचा आहे, अरविंद केजरीवाल यांची टीका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांना आम आदमी पार्टी हा पक्ष संपवायचा आहे. तेच त्यांचं धोरण आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.

आपच्या पक्षाच्या कार्यालयातील सभेत अरविंद केजरीवाल यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला संपवण्याचा कट रचत आहेत. त्यासाठी मोदींकडे तीन कट तयार आहेत. पहिला कट आमच्या सगळ्या नेत्यांना जेलमध्ये टाकलं जाईल. त्यानंतर दुसरा कट म्हणजे आमची सगळी खाती गोठवण्यात येतील आणि तिसरा कट म्हणजे आमच्या पक्षाचं कार्यालय रिकामं करतील. या मार्गांनी आमच्या पक्षाला ते संपवू इच्छितात, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला त्यांना जेलमध्ये टाकायचं आहे. हातकड्या घालायच्या आहेत. पण आम्ही घाबरणार नाही. प्रत्येक आव्हानांना सामोरं जाऊन आम्ही आजही भाजप आणि मोदी सरकारच्या विरुद्ध नेटाने उभे आहोत. त्यांना वाटतंय की छोटासा पक्ष आहे. पण त्यांना हे माहीत नाही की हा 140 कोटी जनतेचा पक्ष आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली आहे.