एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत…. रोहित शर्माने स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले

अनेकदा खेळाडूंचे प्रॅक्टिंस दरम्यान किंवा मॅचदरम्यान बोलतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी रोहीत शर्मा याने चक्क एका कॅमेरामनला आमचे संभाषण रेकॉर्ड करू नको असे हात जोडून सांगितले होते. मात्र तरिही प्रसारमाध्यमांमध्ये सतत असे व्हिडीओ अपलोड केले जात असल्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहीत शर्मा हा भडकला असून त्याने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत स्टार स्पोर्ट्स वाहिनीला फटकारले आहे.

”क्रिकेटपटूंच्या आयुष्यात सध्या इतकी घुसखोरी सुरू आहे की आता आम्ही आमच्या मित्र आणि सहकाऱ्यांसोबत ट्रेनिंगदरम्यान मॅचदरम्यान काय बोलतो ते देखील रेकॉर्ड केले जात आहे. स्टार स्पोर्ट्सला माझे संभाषण रेकॉर्ड करू नका असे सांगूनही, त्यांनी ते केले व नंतर ते प्रसारित केले गेले. एक्स्झ्लिुझिव्ह कंटेट मिळवण्याच्या या स्पर्धेत फक्त व्ह्यूज आणि आपल्या वाहिनीच्या प्रसिद्धीकडे लक्ष दिले जात आहे. यामुळे एक दिवस चाहते, क्रिकेटपटू आणि क्रिकेटमधील विश्वासाला तडा जाईल.”