इस्रायलने युद्धबंदीचा प्रस्ताव स्वीकारला

हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध आता थांबवण्याची वेळ आली आहे, असे सांगत हमासमध्ये आता इस्रायलवर आणखी हल्ले करण्याची हिंमत नाही. त्यामुळे इस्रायलने नवीन युद्धविराम योजना स्वीकारली आहे, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केला. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बायडन यांनी हा दावा केला आहे. इस्रायलने सर्व ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात युद्ध संपवण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

गाझातील शिबिरात 70 मृतदेह आढळले

गाझाच्या जबालिया निर्वासित छावणीमध्ये 70 फिलिस्तीनींचे मृतदेह आढळले आहेत. इस्रायलने आपल्या सशस्त्र सैन्यांना माघारी बोलावल्यानंतर हे मृतदेह आढळले आहेत. 70 मृतदेहांमध्ये 20 मुलांचा समावेश आहे. बेपत्ता लोकांचा शोध अद्याप सुरू आहे.