Video एकाच व्यक्तीने 8 वेळा दिले भाजपला मत, काँग्रेसने शेअर केला व्हिडीओ

विरोधकांकडून सतत ईव्हीएमच्या विश्वासहार्तेवर प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र निवडणूक आयोगाने कायम ईव्हीएम हॅक करणं तसेच ईव्हीएममधून कोणताही गैरप्रकार घडण्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. असे असताना आता उत्तर प्रदेशमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण चक्क आठ वेळा भाजपला मत दिल्याचे दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओमधील तरुण हा एका भाजप कार्यकर्त्याचा मुलगा असल्याचे समजते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

काँग्रेसने व अखिलेश यादव यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून यावरून निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत. अखिलेश यादव यांनी या पोस्ट सोबत एक पोस्ट शेअर करत निवडणूक आयोग व भाजपला फटकारले आहे. ”निवडणूक आयोगाला हे चुकीचं वाटत असेल तर ते कारवाई करतील. नाही तर… भाजपची बूथ कमेटी ही लूट कमेटी आहेच”, अशी टीका अखिलेश यादव यांनी केली आहे.

राहुल गांधी यांनी देखील अखिलेश यादव यांची पोस्ट रिट्विट करत भाजपला फटकारले आहे. ”आपला पराभव समोर बघून भाजप जनादेशाला डावलण्यासाठी सरकारी यंत्रणांवर तबाव टाकूीन लोकशाहूला लुटायचा प्रयत्न करत आहे. सर्व निवडणूक अधिकारी त्यांची संविधानिक जबाबदारी विसरणार नाहीत अशी काँग्रेस त्यांच्याकडून अपेक्षा करते. नाहीतर इंडिया आघाडीचे सरकार बनताच अशी शिक्षा करू की यापुढे कोणी संविधानाच्या शपथेचा अवमान करण्याआधी 10 वेळा विचार करेल”, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.