कान्सच्या कार्पेटवर दिसणार मराठी अभिनेत्रीचा स्वॅग, वाचा बातमी

सध्या 77व्या कान्स फिल्म फेस्टिवलची धूम सुरू आहे. फ्रान्समध्ये पार पडणाऱ्या या सोहळ्याचं आकर्षण म्हणजे या सोहळ्याला हजेरी लावणाऱ्या विविध मान्यवरांची मांदियाळी आणि त्यांचे रेड कार्पेट लुक्स. बॉलिवूडच्या सौंदर्यवतींनी गाजवलेलं रेड कार्पेट यंदा एक मराठमोळी अभिनेत्री झोकात गाजवताना दिसणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे छाया कदम.

फँड्रीपासून सुरू झालेला छायाचा प्रवास आता लापता लेडीजच्या मंजु माईपर्यंत आला आहे. मराठी सोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला डंका वाजवणाऱ्या छाया या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर हजेरी लावणार आहेत. सोनेरी रंगाची नक्षी आणि किनार असलेली साडी, त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज आणि नाकात नथ अशा थाटात छाया कदम यांनी आपला एक फोटो सोशल मीडियावर टाकला आहे.

आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले. …पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हल पर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. Love you मम्मुडी आणि खूप खूप मिस यू” अशी कॅप्शनही त्यांनी या पोस्टवर लिहीली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chhaya Kadam (@chhaya.kadam.75)