आचारसंहितेचे उल्लंघन करत भाजपकडून खुला प्रचार, आदित्य ठाकरेंनी दिला कडक इशारा

मुंबईत उद्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडणार आहे. या टप्प्याचा खुला प्रचार शनिवारी 18 मे रोजी संध्याकाळी पाच वाजता थंडावला. मात्र गुंडाराज करणाऱ्या भाजप थेट निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेला फाट्यावर मारत दक्षिण मुंबईत खुला प्रचार करत असल्याचे समोर आले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या या खुल्या प्रचाराचा भंडाफोड केला आहे.

भाजपचे मुंबईतील आमदार व पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पेडर रोड येथील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून एक निमंत्रण पाठवले असून जास्तित जास्त लोकांनी या कार्यक्रमात येण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत निवडणूक आयोगाकडे व मुंबई पोलिसांकडे याची तक्रार केली आहे.

”निवडणूक आयोगाकडून फार काही ते करतील अशी अपेक्षा नाही, पण तरीही तुमचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहे. बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारमधील पालकमंत्री मंगळप्रभात लोढा यांची प्रॉक्सी मोहीम आज मुंबईतील धीरज अपार्टमेंट्स, पेडर रोड येथे होणार आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी लोढा फाउंडेशनच्या नावाने लोकांना निमंत्रण पाठवले आहे. निवडणुकीच्या एक दिवस आधी ही प्रॉक्सी मोहीम आहे, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

या ट्विट सोबत आदित्य ठाकरे यांनी हा छुपा प्रचार न रोखल्यास त्या ठिकाणी जाऊन आम्ही देखील लोकांचे प्रश्न जाऊन घेऊ असा इशारा दिला आहे. ” एकतर तुम्ही तत्काळ पाऊल उचलत सदर प्रचार रोखा किंवा इतर उमेदवार सदर ठिकाणी पोहचून जनेतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी गेलेले तुम्हाला चालतील? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी या ट्विटमधून केला आहे.

”आचार संहितेचे उघड उल्लंघन आहे आणि जर थांबवले नाही तर आम्ही देखील त्याच ठिकाणी भेट देऊ आणि स्थानिक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू”, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.सोबतच या गुन्ह्यासाठी सोसायटीचे अध्यक्ष/सचिवांवर गुन्हा का दाखल करू नये? असा सवालही केला आहे.