सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार शूटरला पैसे पुरवणारा पोलिसांच्या जाळय़ात

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी लॉरेन्स बिष्णोई गँगच्या आणखी एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने राजस्थान येथून अटक केली. मोहम्मद रफिक चौधरी असे त्याचे नाव आहे. गोळीबार करण्यासाठी शूटरला मोहम्मदने पैसे पुरवल्याचे तपासात समोर आले आहे. मोहम्मदच्या अटकेने अटक आरोपीची संख्या पाच झाली आहे. त्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

गेल्या महिन्यात सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर गोळीबार झाला होता. गोळीबारप्रकरणी गुन्हे शाखेने तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून सागर गुप्ता आणि विकी पालला अटक केली. त्या दोघांच्या चौकशीत पोलिसांना आणखी माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक राजस्थान येथे गेले. तेथून पोलिसांनी मोहम्मदला ताब्यात घेतले. मोहम्मद हा बिष्णोई गँगशी संबंधित आहे. गोळीबारासाठी मोहम्मदने विकी आणि सागरला पैसे पुरवले होते. त्या पैशातून त्या दोघांनी मोटरसायकल आणि घराचे भाडे दिले होते. तसेच मोहम्मद हा दोन वेळेस पाल आणि गुप्ताला भेटला होता. त्या दोघांना सलमानच्या घराबाहेर रेकी करण्यास मदत केली होती. तसेच मोहम्मदने त्या दोघांना लॉजिस्टिक सपोर्टदेखील केला होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.

…आणि अनमोल बिष्णोईच्या संपर्कात आला
मोहम्मदची मुंबईत डेअरी होती, मात्र लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे साधन नसल्याने तो राजस्थान येथे गेला. त्यानंतर तो राजस्थान येथे बिष्णोई गँगशी जोडला गेला. मोहम्मद हा थेट अनमोल बिष्णोईच्या संपका&त होता अशी माहिती तपासात समोर आली आहे.