पुन्हा पुतीनराज; पाचव्यांदा शपथ, 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष

व्लादिमीर पुतिन यांना आज पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मॉस्कोमधील ग्रँड व्रेमलिन पॅलेसच्या सेंट अँड्रय़ू हॉलमध्ये त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून आज दुपारी शपथ घेतली. हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी अडीच ते साडेतीन यादरम्यान त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रशियामध्ये 15-17 मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना 88 टक्के मते मिळाली. त्यांचे विरोधक निकोले खारिटोनोव्ह यांना केवळ 4 टक्के मते मिळाली आहेत. पुतिन यांनी 2000 मध्ये पहिल्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ते 2004, 2012 आणि 2018 मध्येही राष्ट्रपती झाले आहेत.

रशियन राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. यामुळे 8 मे 2008 रोजी पुतिन यांनी माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनवले आणि ते स्वतः पंतप्रधान झाले. नोव्हेंबर 2008 मध्ये, दिमित्री यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ 4 वरून 6 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी घटना दुरुस्ती केली. जानेवारी 2020 मध्ये पुतिन यांनी घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रपती पदाची दोन वर्षे मुदतीची मर्यादा रद्द केली. त्यामुळे पुतिन हे आता 2036 पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी राहणार आहेत.

l शपथविधी सोहळ्याला रशियाच्या फेडरल कौन्सिलचे सदस्य (सिनेटचे खासदार), स्टेट डयूमाचे सदस्य (खालच्या सभागृहाचे खासदार), उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, विविध देशांचे राजदूत आणि पुतिनचे चौथे अधिकारी उपस्थित होते.

l रशियाच्या नव्या राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपला उजवा हात संविधानाच्या प्रतीवर ठेवून पदाची शपथ घेतली. यानंतर घटनात्मक न्यायालयाच्या अध्यक्षांनी त्यांना पदाची साखळी देत राष्ट्रपतींची शपथ पूर्ण झाल्याचे घोषित केले. व्रेमलिन पॅलेसमध्ये राष्ट्रगीत वाजवले.