बाजारातील ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यास नकार!

शेअर बाजारातील कामकाजाच्या वेळा वाढवण्याबाबत सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने नकार दर्शवला आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजने डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमधील स्टॉक मार्केटमधील ट्रेडिंग तास वाढवण्याचा प्रस्ताव सेबीकडे पाठवला होता, परंतु सेबीने एनएसईच्या ट्रेडिंग तास वाढवण्याचा प्रस्ताव अमान्य करत परत पाठवला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने डेरिव्हेटिव्ह मार्केट सायं. 6 ते रात्री 9 या काळात व्यापार सुरू ठेवण्यासाठी मार्केट रेग्युलेटरकडे अर्ज दाखल केला होता.