आता एनआरआय करणार यूपीआयने पेमेंट

रोख रकमेने पेमेंट करणे हिंदुस्थानात सर्रास झाले आहे. परंतु, आता अनिवासी हिंदुस्थानी (एनआयआय) यांना आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबरद्वारे यूपीआयने पेमेंट करता येणार आहे. आयसीआयआय बँकने ही सोमवारी घोषणा केली असून आता यूपीआय पेमेंट करण्यासाठी हिंदुस्थानी मोबाइल नंबरवर स्विच करण्याची आवश्यकता नाही. यूपीआय पेमेंट करण्यासाठी ते त्यांचा आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकाचा वापर करू शकतील. पूर्वी अनिवासी हिंदुस्थानींना यूपीआय पेमेंट करण्यासाठी त्यांच्या बँकांमध्ये हिंदुस्थानी मोबाइल क्रमांकाची नोंदणी करावी लागत होती.