साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 7 ते शनिवार 13 एप्रिल 2024

>> नीलिमा प्रधान

मेष – कामामध्ये सतर्क रहा

मेषेच्या व्ययेषात बुध वक्री, स्वराशीत सूर्य. सप्ताहाच्या उत्तरार्धात समस्येवरील समाधान शोधता येईल. नोकरीत कामामध्ये सतर्क रहा. जास्त अपेक्षा ठेऊ नका. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणाने विधान करू नये. कायदा पाळावा. नवीन परिचयाचा अनुभव घ्या.

शुभ दिनांक – 12, 13

वृषभ – सौम्य धोरण ठेवा

वृषभेच्या एकादशात बुध वक्री, व्ययेषात सूर्य. सप्ताहाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामे करा. नवीन परिचय वाढतील. तुमच्या क्षेत्रात नवे शिकायला मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सौम्य धोरण ठेवा. कुठेही अपेक्षा करू नका. धंद्यात वाढ, लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात धोका पत्करू नका. वरिष्ठांच्या विरोधात जाऊ नका.

शुभ दिनांक – 7, 12

मिथुन – महत्त्वाची कामे होतील

मीन राशीत बुध वक्री, मिथुनेच्या एकादशात सूर्य. सप्ताहाच्या शेवटी तणाव, चिंता जाणवतील. महत्त्वाची कामे होतील. नवीन परिचय प्रेरणादायक ठरेल. कला, क्रीडा, साहित्यात प्रगती होईल. नोकरीत चंचलपणा ठेऊ नका. कामात वर्चस्व राहील. कौतुक होईल. धंद्यात पुढे जाल. आळस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मानसन्मान मिळेल.

शुभ दिनांक – 7, 9

कर्क – वेगाने ध्येय गाठाल

मीन राशीत बुध वक्री, कर्केच्या दशमेषात सूर्य. सोमवारपासून अधिक वेगाने ध्येय गाठता येईल. अतिमहत्त्वाची कामे करून घ्या. नोकरीत बढती, बदली होईल. गैरसमज दूर करून नव्या दिशेने जाल. धंद्यात तणाव वाढवू नका. प्रवासात धाडस नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतच्या स्थानासाठी मेहनत घ्या. वाद न वाढवता भविष्यासाठी पेरणी करा.

शुभ दिनांक – 9, 10

सिंह – नोकरीत व्याप राहील

मीनेत बुध वक्री, सिंहेच्या भाग्येषात सूर्य. क्षेत्र कोणतेही असो, नम्रता, संयम, सहनशीलता ठेवा तर प्रतिमा डागाळणार नाही. नोकरीत व्याप राहील. गैरसमज होतील. धंद्यात तणाव, खर्च जाणवेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चौफेर सावध रहा. विरोधक तुमच्यावर मोठा डाव टाकतील. संसारात भावुक होऊ नका.

शुभ दिनांक – 12, 13

कन्या – प्रवासात धोका नको

मीनेत बुध वक्री, कन्येच्या अष्टमेषात सूर्य. तारतम्य, सहजता, तडजोड करण्याची तयारी तुमच्या क्षेत्रात ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. प्रवासात धोका नको. सर्वत्र कायदा पाळा. वसुली करा. धंद्यात क्षुल्लक अडचणी येतील. राजकीय, सामजिक क्षेत्रात क्षुल्लक व्यक्तीलासुद्धा कमी समजू नका. तुमच्या योजना पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवा.

शुभ दिनांक – 7, 12

तुळ – कायद्याचे पालन करा

मीनेत बुध वक्री, तूळेच्या सप्तमेषात सूर्य. संमिश्र स्वरूपाच्या घटना सप्ताहात घडतील. समतोल राखा. अतिशयोक्ती व भावनाविवशता यामुळे क्षुल्लक अडचणी येतील. नोकरीत गैरसमज. धंद्यात हिशेबात लक्ष द्या. वसुलीचा प्रयत्न करा. कायद्याचे सर्वत्र पालन करा. राजकीय, सामाजिक कार्यात मागे खेचण्याचा प्रयत्न होईल.

शुभ दिनांक – 9, 10

वृश्चिक – शब्द जपून वापरा

मीनेत बुध वक्री, वृश्चिकेच्या अष्टमात सूर्य. गुढीपाडव्याच्या fिदवशी मन अस्थिर होईल. शब्द जपून वापरा. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात वाढ, वाद होतील. नवे पfिरचय होतील. थकबाकी मिळवा. कल्पनाशक्तीला चालना देणारी घटना मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा गवगवा होईल. अहंकारयुक्त भाषा समस्या निर्माण करेल.

शुभ दिनांक – 7, 11

धनु – अडचणीतून यश मिळेल

मीन राशीत बुध वक्री, धनुच्या पंचमेषात सूर्य. जिद्द, आत्मविश्वास यावर अडचणीतून यश मिळवाल. उत्साहवर्धक वातावरण राहील. नोकरीत क्षुल्लक वाद होतील. धंद्यात सुधारणा करण्याची संधी मिळेल. भावनेच्या आहारी जाऊ नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जवळच्या व्यक्ती त्रास देतील. कायद्याला धरून वागा.

शुभ दिनांक – 9, 10

मकर – अनाठायी खर्च होतील

मीन राशीत बुध वक्री, मकरेच्या चतुर्थात सूर्य. भागीदारासोबत वाद, तणाव होईल. डोळ्यांची काळजी घ्या. अनाठायी खर्च  होतील. नोकरीत वर्चस्व राहील. धंद्यात नम्रता ठेवा. प्रगतीची संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बोलण्याचा गैरअर्थ काढण्याचा काही व्यक्ती प्रयत्न करतील. प्रतिष्ठा जपता येतील. कौटुंबिक वाटाघाटीचा प्रश्न सोडवावा लागेल.

शुभ दिनांक – 7, 9

कुंभ – कोर्टाच्या कामात यश

मीनेत बुध वक्री, कुंभेच्या पराक्रमात सूर्य. महत्त्वाची कामे करा. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरीत वर्चस्व राहील. कामाचे कौतुक होईल. धंद्यात वाद नको. लाभ वाढेल. खरेदी विक्रीत लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बरोबर अंदाज येतील. नवे डावपेच आखा. योजना पूर्ण करा.

शुभ दिनांक – 9, 10

मीन – नव्या कार्याचा आरंभ

स्वराशीत बुध वक्री, धनेषात सूर्य. रागावर ताबा ठेवा. कुणालाही कमी समजू नका. तुमच्या क्षेत्रात मोठे यश मिळेल. प्रवासात घाई नको. कठीण प्रश्न सोडवा. कामाची प्रशंसा होईल. धंद्यात यांत्रिक खर्च होईल. नवे काम मिळेल. दिग्गज व्यक्तींचा परिचय प्रेरणादायक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, अधिकार लाभेल. नव्या कार्याचा आरंभ होईल.

शुभ दिनांक – 9, 11