वृद्ध सासूसोबत राहायचे नसल्यास घटस्फोट योग्य!

पती आणि पत्नीमधील संबंध पूर्वीप्रमाणे राहिले नाहीतहे नाते पूवीसारखे होण्याची शक्यता नाहीत्यामुळे या दोघांनी विभक्त होणे चांगले. 75 वर्षाच्या वयोवृद्ध सासूसोबत राहण्यास सुनेने नकार दिल्यानंतर पंजाब हरयाणा उच्च न्यायालयाने पती-पत्नीचा घटस्फोट मंजूर केला. कुटुंबासोबत राहायचे नसेल आणि काही समझोता करायचा नसेल तर पती आणि पत्नीने विभक्त होणे हेच चांगले आहे, असे न्यायालयाने म्हटले. सासरी राहणाऱया महिलेच्या घरात 75 वर्षाची एक वयोवृद्ध सासू आहे. तसेच एक मानसिक आजाराने ग्रस्त नणंद आहे. यामुळे महिला सासरी राहू इच्छीत नाही. यामुळे कोर्टाने पती-पत्नीच्या घटस्पह्टाला मंजुरी दिली. न्यायमूर्ती सुधीर सिंह आणि न्यायमूर्ती हर्ष बुंगेर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. ट्रायल कोर्टाने याआधीच या घटस्पह्टाला मंजुरी दिली होती. परंतु, महिलेने या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. परंतु, हायकोर्टाने महिलेचा अर्ज फेटाळून लावला. या जोडप्याचा विवाह 1999 साली झाला होता. यानंतर पतीने 2016 मध्ये घटस्पह्टासाठी अर्ज दाखल केला. 2016 पासून महिला आपल्या दोन मुलींसोबत विभक्त राहते.