Photo – तेजस्वी प्रकाशचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, पाहा फोटो

टिव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 15’ ची विजेता तेजस्वी प्रकाश कायम चर्चेत असते. तिचा अभिनय आणि सौदर्यांबरोबरच तिच्या स्टायलिश लूकसाठीही ती प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. नुकतेच तेजस्वीने काही पांढऱ्या रंगातल्या वनपीसमध्ये फोटो शेअर केले आहेत. यात तिने केस बांधले असून चेहऱ्यावर हलका मेकअप केला आहे. यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. चाहत्यांना तिचे हे फोटो आवडले असून चाहते सुंदर, प्रिटी, डॉल अशा कॉमेण्ट्स केल्या आहेत. तर या फोटोंवर लाखो लाईक्सही आहेत.