जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्यांनी डोळे तपासून घ्यावेत, चिदंबरम यांची टीका

काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर बोलणाऱ्यांवर सडकून टीका केली. जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करतात, त्यांनी डोळे तपासून घ्यावेत अशी टीका केली आहे. आज काँग्रेसचं सरकार असतं तर 2023-24मध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेने 200 लाख कोटींचा टप्पा पार केला असता, असंही चिदंबरम म्हणाल आहेत.

चिदंबरम हे जाहीरनामा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष आहेत. जाहीरनाम्यात जनरेशन ऑफ वेल्थ या शब्दांऐवजी जे डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ असल्याचं सांगत आहेत, त्यांनी एकतर शाळेत जाऊन पुन्हा शिक्षण घ्यावं किंवा डोळे तपासून घ्यावेत. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून त्या धोरणांविषयी सांगितलं आहे, ज्यात वस्तू आणि सेवांच्या निर्मितीला प्राधान्य असेल. तसंच फ्री अँड फेअर व्यापारी तत्वाला रोखणाऱ्या नियमांनाही बदलण्यात येईल, असं चिदंबरम म्हणाले आहेत.

काँग्रेस जर सत्तेत आली तर पुढील दहा वर्षांत जीडीपी दुप्पट व्हावा हे लक्ष्य असेल, असंही चिदंबरम यावेळी म्हणाले.