लातूरात निवडणूक अधिकारी कर्मचारी गाण्यावर थिरकले

मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी थेट झुंबा डान्स आयोजित करण्यात आला होता. हे सर्व अधिकारी कर्मचारी गाण्यावर फिरकले. यामुळे मनावरील ताण आणि दडपण कमी होण्यास मदत झाली.

मतदान केंद्रावर नियुक्त मतदान पथकातील अधिकारी, कर्मचारी यांच्या मनावरील दडपण कमी व्हावे, यासाठी लातूर ग्रामीणच्या मतदान साहित्य वाटप केंद्रावर अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी झुंबा डान्स आयोजित करण्यात आला होता. मतदान केंद्रावरील नियुक्त करण्यात आलेल्या पथकतील अधिकारी कर्मचारी यांनी गाण्यावर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.