राकेश बेदी यांची पत्नीची सायबर फसवणूक, लाखो रूपयांचा चुना

बॉलीवूडचे आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. राकेश बेदी यांची पत्नी आराधना बेदी या सायबर क्राईमच्या शिकार झाल्या आहे. आराधना यांचे तब्बल 5 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.

राकेश बेदी यांच्या पत्नी आराधना यांना एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला होता. या व्यक्तिने आराधना यांना हा फोन बँकेतर्फे करण्यात आल्याचे सांगितले होते. यानंतर त्याने आराधना यांना तुमच्या खात्यात चुकून पैसे आले आहेत. ते पैसे दुसऱ्या ग्राहकाचे असल्यामुळे तुम्हाला ते परत करावे लागतील. त्यासाठी एक ओटीपी येईल तो आम्हाला सांगा असे त्या व्यक्तीने आराधना यांना सांगितले.

आराधना यांना फोन करणाऱ्याचा संशय आल्याने त्यांनी फोन कट केला. मात्र, असे असतानाही त्यांच्या खात्यातून 4 लाख रुपये गायब झाले. फसवणूक झाल्यानंतर आराधना यांनी बँकेशी आणि नंतर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे. पोलीस याबाबत पुढील तपास करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी राकेश बेदी यांचीही सायबर फसवणूक झाली होती. राकेश बेदी यांनी आपला पुण्यातील टू बीएचके फ्लॅट विकायचा आहे, त्यासाठी त्यांनी जाहिरात दिली होती. त्यानंतर लष्करी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तिने फ्लॅट खरेदी करण्यात रस दाखवला आणि फसवणूक करण्यासाठी त्यांचे बँकिंग तपशील घेतले, त्यानंतर बेदी यांना 85 हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.