दिल्लीनंतर आता अहमदाबादच्या 7 शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी

मागच्या काही दिवसांपासून दिल्ली एनसीआरच्या अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याची ईमेलद्वारा धमकी दिली होती. ज्यानंतर सगळीकडे एकच खळबळ माजली. आता दिल्लीनंतर अहमदाबादमधील सात शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी दिली असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या एका दिवसाआधी एक ईमेल आला ज्यात एकापाठोपाठ एक अशा सात शाळांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर अहमदाबादचे क्राईम ब्रान्च पथक घटनास्थळी पोहोचून तपासाला वेगाने सुरुवात केली आहे. जागरणच्या वृत्तानुसार, आज सकाळी 7 ते 8 शाळांना एक ईमेल आला. त्यात लिहीले की, शाळा बॉम्बने उडविण्याची धमकी दिली आहे, पोलिसांनी तपास केला असता हा फेक मेल आयडी असल्याचे कळले. त्याचा तपास सुरु आहे.

डीपीएस बोपल, आनंद निकेतन बोपल, एशिया इंग्लिश स्कूल – वस्त्रपुर, कैलोरेक्स स्कूल- घाटलोडिया, न्यू नोबल स्कूल व्यासवाडी – नरोदा, ओएनजीसी केंद्रीय विद्यालय – चांदखेड़ा, अमृता विद्यालय- घाटलोडिया, या शाळांना धमकी देण्यात आली आहे. या शाळांमध्ये बॉम्ब निकामी करणारे पथक तपासणी करत आहे. याव्यतिरिक्त अहमदाबाद सायबर क्राईम सध्या तो मेल कुठून आणि कोणी पाठवला याचा तपास करत आहेत. अहमदाबाद पोलिसांना जनतेला अशा प्रकारच्या अफवांपासून सावधान राहा आणि संशयित वस्तू आढळल्यास पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे,.