इराणमध्ये माशांचा पाऊस!

इराणमध्ये चक्क माशांचा पाऊस पडला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून यात चक्क मोठमोठे मासे आकाशातून जमिनीवर पडत आहेत. या व्हिडीओमुळे अनेक जण हैराण झाले आहेत. वैज्ञानिकांच्या मते ही एक असामान्य घटना आहे. याला ‘ऑनिमल रेन’ किंवा ‘फॉलिंग ऑनिमल्स’ असे म्हटले जाते. व्हायरल व्हिडीओत जमिनीवर मासे पडत आहेत. लोक मोठय़ा हैराणीने याकडे पाहत आहेत. काही लोकांनी तर मासे उचलून आपल्या घरीही नेले आहेत. हे दृश्य एक वेगळेच असून याला सोशल मीडियावर खूपच पसंत केले जात आहे. ऑनिमल रेनची ही घटना पहिल्यांदा घडली नाही. याआधीही अनेक भागात अशा घटना घडल्या आहेत. कधी बेडुक तर कधी माशांचा पाऊस पडतो. माशांचा पाऊस पडणे ही क्वचित घटना असली तरी ती अनेक ठिकाणी पाहायला मिळते. खेकडे, मासे, बेडुक अशा कितीतरी जलचर प्राण्यांचा पाऊस पडला आहे.

माशांचा पाऊस का पडतो?

माशांचा पाऊस पडणे हे काही नवीन नाही. याला ‘ऑनिमल रेन’ किंवा ‘फॉलिंग ऑनिमल्स’ असे म्हटले जाते. जेव्हा चक्रीवादळ पाण्याच्या पृष्ठभागावरून जाते तेव्हा अशा घटना घडतात. चक्रीवादळाची जबरदस्त शक्ती बेडूक, खेकडे किंवा लहान मासे उचलले जाते आणि त्यांना मोठय़ा उंचीवर घेऊन जाते. मग हे चक्रीवादळ या सागरी प्राण्यांना पावसाबरोबर खाली फेकतात, असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

 भर रस्त्यांत माशांचा पाऊस पडताच अनेकांनी हाताने मासे पकडून त्याचे पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.