प्रशांत किशोर हे भाजपचे एजंट, तेजस्वी यादव यांची टीका

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मुलाखतीवरून सध्या राजकीय वर्तुळात त्यांच्यावर टीका केली जात आहे. निवडणुकीसंबंधी त्यांनी वर्तवलेल्या अंदाजावरून राजद नेते तेजस्वी यादव यांनी टीका केली आहे. प्रशांत किशोर हे भाजपचे एजंट आहेत, भाजप त्यांना निधी पुरवत आहे, असं यादव म्हणाले आहेत.

तेजस्वी यादव म्हणाले की, प्रशांत किशोर हे भाजपचे एजंट आहे. भाजपला जेव्हा निवडणुकीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात कळलं की आपला पराभव होतोय तेव्हा आपल्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी प्रशांत किशोर यांच्याकडून वक्तव्य करवून घ्यायला सुरुवात केली. प्रशांत किशोर यांना माझे काका (नीतिश कुमार) यांनीही सांगितलं होतं की, अमित शहा यांच्या सांगण्यावरून आम्ही तुम्हाला राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं आहे. आजपर्यंत त्या वक्तव्याला अमित शहा किंवा प्रशांत किशोर यांनी विरोध केलेला नाही. तो व्हिडीओ माझ्याकडे अजूनही आहे. तुमच्याकडेही असेल, ज्यात नीतिश कुमार म्हणतात की आमच्या सांगण्यावरून अमित शहांनी प्रशांत किशोरला राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवलं, असं तेजस्वी यादव म्हणाले. ते पुढे म्हणाले की, प्रशांत किशोर हे सुरुवातीपासूनच भाजपचे राहिले आहेत. पण जो पक्ष यांच्यासोबत काम करेल, तो बरबाद होईल. हे आम्हाला ठाऊक आहे, असंही तेजस्वी यादव यावेळी म्हणाले.