अशोक सराफ, रोहिणी हट्टंगडी यांना नाटय़ परिषदेचा जीवनगौरव

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार आज जाहीर झाला. येत्या 14 जून रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़ संकुलात हा सोहळा होईल.

नाटय़ क्षेत्रात भरीव काम करणाऱया नाटय़कर्मींचा सत्कार नाटय़ परिषदेच्या वतीने केला जातो. यनिमित्ताने कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 100 व्या नाटय़ संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘नाटय़ कलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाटय़, एकपात्री, नाटय़ छटा, नाटय़ संगीत पद गायन, नाटय़ अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत.