IPL पेक्षा टीम इंडियात हजार पट राजकारण; राहुलच्या हवाल्याने जस्टिन लँगरचा खळबळजनक दावा

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागविले आहेत. 27 मे ही अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे. आगामी महिन्यात टी-20 वर्ल्डकपचा बिगूल वाजणार असून तदनंतर राहुल द्रविड याचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात असून हिंदुस्थानसह अनेक विदेशी खेळाडूही यासाठी रांगेत आहेत. मात्र अद्यापपर्यंत तरी प्रशिक्षकपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे स्पष्ट झालेले नाही. रिकी पॉण्टिंग, स्टिफन फ्लेमिंग, अँडी फ्लॉवर, गौतम गंभीरसह अनेक खेळाडूंची नावे यासाठी चर्चेत आहेत. यादरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षकपद भूषवणाऱ्या जस्टिन लँगर याने एक खळबळजनक विधान केले आहे.

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करणे ही सुवर्णसंधी आहे. मात्र मी जाणीवपूर्वक यापासून लांब रहात आहे. ही एक सर्वमावेशक भूमिका असून 4 वर्ष ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षकपद म्हणून कार्य करताना मला याची जाणीव झाली आहे. प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास हे खूप थकवणारे काम आहे, असे जस्टिन लँगर ‘बीबीसी’च्या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला.

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यास अडचण काय आहे? असे विचारले असता जस्टिन लँगर याने लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलसोबत झालेले संभाषण सांगितले. केएल राहुलसोबत मी याच विषयावर गप्पा मारत होतो. तेव्हा तो म्हणाला की आयपीएलमध्ये जेवढा तणाव आणि राजकारण (प्रेशर आमि पॉलिटिक्स) दिसते, त्याहून हजारपट अधिक राजकारण हिंदुस्थानच्या संघात आहे. त्यामुळे मला वाटते की राहुलने मला एक चांगला सल्ला दिला, असेही जस्टिन लँगर म्हणाला. मात्र यादरम्यान त्याने आपण भविष्यात टीम इंडियाचे प्रशिक्षकपद स्वीकारणारच नाही असे म्हटले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

जस्टिन लँगर हे सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. आयपीएलच्या सुरुवातीला चांगली कामगिरी केल्यानंतर लखनऊच्या संघाला सातत्य राखता आले नाही आणि हा संघ सातव्या स्थानावर फेकला गेला.

मला टीम इंडियाचे प्रशिक्षक व्हायचंय, पण आताच नाही! रिकी पॉण्टिंगची शर्यतीतून माघार

दरम्यान, याआधी जस्टिन लँगरने ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. चार वर्ष ते ऑस्ट्रेलियाच्या संघाचे प्रशिक्षक होते. बॉल टेम्परिंगच्या प्रकरणानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षकपद स्वीकारले होते. या कठीण परिस्थितीतून त्यांनी संघाला बाहेर काढले आणि पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाने अॅशेस सिरीज आणि टी-20 वर्ल्डकपवरही नाव कोरले.

मी स्वत:ची टीम सुरू करतोय! धोनीच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण