सुपरस्टार शाहरुख खान याला बुधवारी उष्माघाताच्या त्रास झाल्याने त्याला अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शाहरुख खानला दुसऱ्या दिवशीही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. मात्र त्याची मॅनेजर पूजा ददलानी हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत तिने शाहरुख खानच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे. शिवाय चाहत्यांचे आभारही व्यक्त केले आहेत.
शाहरुख खानची मॅनेजरर पूजा ददनानी ने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये लिहीले आहे की, शाहरुख खान याची प्रकृती स्थिर आहे. मिस्टर खानचे चाहते आणि शुभचिंतकांनी दाखवलेले प्रेम, काळजी आणि प्रार्थनेसाठी मनापासून आभार.
शाहरुख खानचा आयपीएल मधील संघ कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्वालिफायर सामन्यात हैदराबादला हरवून अंतिम फेरी गाठली आहे. हा सामना पाहण्यासाठी व आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खान अहमदाबाद येथे मंगळवारी पार पडलेल्या सामन्याला हजर राहिला होता. या सामन्यानंतर शाहरुखला उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्याला अहमदाबादमधील केड़ी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.