Photo – पोलिसांची म्हशीवरून गस्त

घोड्यावरून किंवा वाहनांमध्ये बसून पोलिसांनी गस्त घातल्याचे तुम्ही अनेकवेळा पाहिले असेल. मात्र ब्राझील मधील मराजो बेटाचे लष्करी पोलीस याला अपवाद ठरले आहेत. कारण हे पोलीस घोड्यावर बसून किंवा वाहनांमधून गस्त घालत नाहीत, तर चक्क म्हशीवर बसून गस्त घालतात. चिखलातून आणि पाण्यातून पळणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. विशेष म्हणजे या म्हशींना प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.