मध्यप्रदेशातून अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई, आरोपीला अटक

महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्याच्या सीमावर्ती जंगलात खैर जातीच्या वृक्षांची अवैध वृक्षतोड केली जात आहे. लाकूड तस्कर वनविभागाला हुलकावणी देत मध्य प्रदेशातील खैर जातीच्या लाकडांची महाराष्ट्रात तस्करी करीत आहेत. अशातच मध्य प्रदेशातील जंगलातील खैर जातीच्या लाकडांची विना परवाना अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व चालकांवर सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमधील खैर जातीचे सुमारे चार टन लाकूड जप्त करण्यात असून अंदाजे तीन लाख 36 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. वाहन चालक यश भाकचंद उर्फ बंटी शरणागत (21, खैरी ता. खैरलांजी, जिल्हा बालाघाट याला अटक करण्यायात आले आहे.