दिल्लीच्या कार्निवल रिसॉर्टमध्ये भीषण आग, सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

दिल्लीच्या अलीपुर परिसर शुक्रवारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दुपारी 2 च्या सुमारास येथील कार्निवल रिसॉर्टला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्यासाठी प्रयत्न करत होत्या. या आगीत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. ही आग रिसॉर्टच्या बॅक्वेट हॉलला लागली होती.

ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत माहिती मिळालेली नाही. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हळहळू ही आग संपूर्ण रिसॉर्टमध्ये पसरली. अग्निशमन दलाची अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले,मात्र तोपर्यंत सर्वकाही जळून राख झाले होते.

आगीमुळे रिसॉर्टच्या मालकाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाला दूरवरून दिसत होत्या. धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. त्यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.