‘भाबीजी घर पर हैं’ फेम अभिनेता फिरोज खान यांचे निधन

भाबीजी घर पर हैं… या बहुचर्चित हिंदी मालिकेतील अभिनेता फिरोज खान यांचे निधन झाले आहे. अमिताभ बच्चन यांची हुबेहूब नक्कल करून चाहत्यांना खळखळून हसवणारे फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 23 मे रोजी सकाळी त्यांनी बदायूंमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. फिरोज खान यांच्या निधनाच्या वृत्तानंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FIROZ KHAN (@ifirozkhanofficial)

फिरोज खान यांनी फक्त टीव्हीवरच नव्हे तर चित्रपटांमध्येही काम केले आहे. एक उत्तम मिमिक्री मॅन आणि बिग बी यांच्या नक्कल करण्यासाठी ते ओळखले जायचे. अमिताभ बच्चन यांची नक्कल करुन प्रसिद्धी मिळाल्यानंतर त्यांनी चित्रपटांमध्येही काम करायला सुरुवात केली. तसेच हिंदी टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले. ‘भाबीजी घर पर हैं!’, ‘जिजा जी छत पर हैं’, ‘साहेब बीबी और बॉस’, ‘हप्पू की उल्टान पलटन’ आणि ‘शक्तिमान’मध्ये ते महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.

फिरोज खान यांनी 4 मे रोजी बदायूं क्लब येथे मतदार महोत्सवात शेवटचा परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमानंतर लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. फिरोज खान सोशल मीडियावर खूप सक्रिय होते. अभिनेत्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याने अनेक चित्रपट कलाकारांची नक्कल केली. ज्यात दिलीप कुमार, शाहरुख खान, धर्मेंद्र आणि सनी देओल यांचा समावेश आहे. अशा सर्वगुणसंपन्न असलेल्या अभिनेत्याच्या निधनामुळे संपूर्ण इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.