रिकी पॉण्टिंग खोटं बोलतोय, BCCI ने सगळ्यांसमोर केली पोलखोल

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी BCCI ने अर्ज मागवले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर विविध खेळाडूंच्या नावांची चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगच नाव सुद्धा चर्चेमध्ये होत. त्याने दावा केला होता की IPL 2024 दरम्यान काही लोकांनी त्याला टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात विचारपूस केली होती. मात्र आता रिकी पॉण्टिंग खोट बोलत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

T20 World Cup 2024 नंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. तसेच राहुल द्रविड संघाचा प्रशिक्षक होण्यास उत्सुक नसल्याचे त्याने याआगोदरच बीसीआयला सांगितले आहे. त्यामुळे बीसीसीआयने अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी जगभरातील दिग्गज खेळाडूंची नावे चर्चेमध्ये आहेत. अशातच रिकी पॉन्टिंगने ICC ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोठा दावा केला होता. “आयपीएल दरम्यान काही लोकांनी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी संपर्क करत माझे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता,” असा दावा रिकी पॉण्टिंगने आयसीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला होता. मात्र त्याने बीसीआयचे नाव घेतले नाही. परंतू समोरा-समोर काही लोकांसोबत चर्चा झाल्याचे त्याने म्हंटल होत.

BCCI चे सचिव जय शाह यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केले आहे. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. परंतू त्यांनी सांगितले की बीसीसीआयने कोणत्याही ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूला टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासंदर्भात विचारपूस केलेली नाही. मीडियामध्ये पसरत असलेल्या गोष्टी या खोट्या आहेत. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची प्रक्रिया विस्तृत आहे. तसेच टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी संबंधित व्यक्तीकडे हिंदुस्थानच्या देशांतर्गत क्रिकेटची समज आणि ज्ञान असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे त्याला हिंदुस्थानच्या क्रिकेटची सखोल माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे.