हिंदुस्थानसह 7 देशांत उष्णतेची लाट

हिंदुस्थानसह अनेक देशांत उष्णतेची लाट आली आहे. हिंदुस्थान, बांगलादेश, पाकिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, माली आणि लिबियामधील तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. अनेक देशांमध्ये रात्रीही उष्णतेची लाट सुरू आहे. मे महिन्यातील सरासरी रात्रीचे तापमान दिवसाप्रमाणे वाढले आहे. पश्चिम आशियामध्ये (सीरिया, इस्रायल, पॅलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन) ते पाच पट वाढले आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्धामुळे उष्णतेची लाट वाढली आहे. आशियातील उष्णतेच्या लाटेचे हे सलग तिसरे वर्ष आहे.

पाकिस्तानात शाळा बंद
मोहेंजोदारोचे तापमान 48.5 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून 31 मेपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
30 जणांचा मृत्यू
बांगलादेशात सलग 26 दिवसांपासून उष्णतेची लाट सुरू आहे. बुधवारी तापमान 43.8 अंशांवर पोहोचले. आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे.
तापमान 48.2 डिग्री
म्यानमारमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली. यामुळे एप्रिल ते 10 मे या कालावधीत देशात दररोज 40 मृत्यू झाले. येथील तापमान 48.2 डिग्री सेल्सिअसवर पोहोचले आहे.