‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हिंदुस्थानचा ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन टू नो’ ठरला अव्वल

साऱ्या जगाचे लक्ष लागलेल्या कान्स फेस्टीव्हलवर यंदा हिंदुस्थानीयांचा बोलबाला दिसत आहे. जिथे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननपासून अदिती राव हैदरी सारख्या अभिनेत्री रेड कार्पेटवर आपल्या फॅशनने सर्वांचे लक्ष वेधले. तर दुसरीकडे पुण्यातील फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या ‘सनफ्लावर वर द फर्स्ट वन्स टू नो’ या चित्रपटाने कान्स महोत्सवाच्या विद्यार्थी गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये ऐश्वर्या राय बच्चनपासून कियारा आडवाणी, जॅकलीन फर्नांडीज, दीप्ती सिधवानी आणि छाया कदम बरोबर अनेक कान्सच्या रेड कार्पेटवर वॉक करताना दिसल्या. तर अनेक बड्या सिनेमांचे प्रिमीयरही या फेस्टिव्हलमध्ये झाले. या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये एफटीआयआयच्या दुसऱ्या शॉ़र्ट फिल्मने कान्सचा पुरस्कार जिंकला आहे. चिदानंद एस नाईक दिग्दर्शित ‘सनफ्लॉवर्स वर द फर्स्ट वन टू नो…’ या लघुपटाने सर्वोत्तम सिनेफ या श्रेणीत पहिला पुरस्कार आहे. हा कन्नड चित्रपट लोककथेवर आधारित आहे. ही हिंदुस्थानासाठी फार आनंदाची बातमी आहे.

आपल्या सिनेमाला कान्सच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळालेल्या यशाबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक चिदानंद वरायटी मॅगझीनशी बोलताना म्हणाला, आमच्याजवळ फक्क चार दिवस होते. हा सिनेमा कन्नडच्या लोककथेवर आधारित आहे. ही ती कथा आहे, जी आम्ही ऐकत मोठे झालो. लहानपणापासूनच ही संकल्पना माझ्या डोक्यात होती. एफटीआयआयच्या सिनेमाला हा पहिल्यांदाच पुरस्कार मिळालेला नाही तर 2020 सालीही एफटीआयआयच्या अश्मिता गुहा नियोगी हिने दिग्दर्शित केलेला ‘कॅटडॉग’ या सिनेमानेही पुरस्कार जिंकला होता.

FTII ने त्यांच्या अधिकृत X च्या अकाऊंटवर शेअर केला आणि म्हटले की हा हिंदुस्थानासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण हिंदुस्थानी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. चिदानंद एस नाईक यांच्या ‘सनफ्लॉवर्स वेअर द फर्स्ट वन्स टू’ या चित्रपटाची कथा कन्नडमध्ये राहणाऱ्या लोकांच्या कथांवर आधारित आहे. या सिनेमामध्ये एका वृद्ध महिलेबाबत सांगितले आहे, जी एक कोंबडी चोरते आणि आपल्या संपूर्ण गावाचे भविष्य अंधकारात ढकलते. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पहिला पुरस्कार जिंकणाऱ्याला 15,000 यूरो बक्षिस दिले जाते.