साईराज ’अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत

 

आमच्या पप्पांनी गणपती आणला…’ या गाण्यावरील रीलमुळे रातोरात लोकप्रिय झालेला बीडचा साईराज केंद्रे हा बालकलाकार आता ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत झळकणार आहे. ही मालिका आता वेगळय़ा वळणावर असून कथानक सात वर्षांनी पुढे ढकलले आहे. साईराज या मालिकेत अप्पी आणि अर्जुनच्या मुलाची म्हणजे अमोलची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या व्हायरल होत असून त्याला चांगलीच पसंती मिळतेय.