ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिंधे गटाला भगदाड; दापोली शिरखल येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना निवडणूकीच्या तोंडावर दापोलीत मिंधे गटाला मोठे भगदाड पडले आहे. शिरखल दगडवणे येथील मिंधे गटातील कार्यकत्यांनी आपल्या मूळ शिवसेना पक्षात घरवापसी केली आहे. दापोलीत लोकसभा निवडणूकीपूर्वीच झालेल्या या राजकिय उलथा पालथीमुळे निवडणुकीतील मताधिक्यांची सारी गणिते बदलणार आहेत. दापोलीत माजी आम. संजय कदम हे आपल्या सक्षम नेतृत्वाचे कसब पणाला लावून शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अगदी पडत्या काळातही चांगलेच प्राबल्य वाढवत आहेत. दापोली विधानसभा मतदार संघात होणारे पक्ष प्रवेश ही बाब शिवसैनिकांना ऊर्जा मिळवून देणारी ठरत आहे. त्यामुळे शिवसैनिकांचे आणखीनच मनोबल वाढत आहे.

ठाकरे आणि शिवसेना वेगळी होवूच शकत नाही. या देशाला आणि राज्याला ख-याअर्थाने उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि युवानेते आदित्य ठाकरे यांच्याच नेतृत्वाची खरी गरज आहे. हे ओळखून माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष संघटनेचे काम करण्यासाठी राकेश सकपाळ (मुंबई मंडळ अध्यक्ष) संतोष जाधव (मुंबई मंडळ सचिव) विजय सालेकर (मुंबई मंडळ खजिनदार), अनंत सकपाळ, बालकृष्ण दाभेकर, सहदेव बामणे, धोंडू चव्हाण, विजय बामणे, जनार्दन सकपाळ, सुनिल जाधव, विजय सालेकर, रणजित जाधव, सुधिर जाधव,संतोष बामणे, संदिप जाधव, प्रणय दाभेकर, महेष बामणे, सचिन सकपाळ, श्रीकांत जाधव, सुर्यकांत चव्हाण, दिपक बामणे, जयवंती सकपाळ, मिनाक्षी जाधव, वनिता सालेकर, शैला सालेकर, पल्लवी सालेकर, करूणा सकपाळ, शुभांगी बामणे, शेवंती दाभेकर, संजना सालेकर, पुष्पा सकपाळ, शेवंती सकपाळ, शोभना सुर्वे, दिलीप सुर्वे आदीं शिरखल दगडवणेतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दापोली विधानसभा मतदार संघातील लोकांच्या सुख दुःखात धावून जाणारे असे संजय कदम हे नेतृत्व आहे. उध्दव ठाकरे यांनी त्यांच्यावर दापोली विधानसभा मतदार संघाची टाकलेली जबादारी पार पाडण्यासाठी एक शिवसैनिक म्हणून आपलाही यात सहभाग असावा या हेतुने संजय कदम यांच्या नेर्तृत्वाखाली शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष संघटनेचे काम करून शिवसेना संघटन अधिक भक्कम करण्यासाठी आपण शिवसेनेत घरवापसी करत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी एकमुखाने सांगितले. यावेळी शिवसेना नेते अनंत गिते, जिल्हा प्रमुख सचिन जाधव, माजी आम. संजय कदम, सहसंपर्क प्रमुख प्रविण लाड, तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालूका सचिव नरेंद्र करमरकर, जि.प. माजी बाधकाम सभापती विश्वास कदम, विभाग प्रमुख विलास कलमकर विष्णू कदम आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.