नगर – एसटी बस व एर्टीगा कारचा भीषण अपघात, दोन ठार; चार जखमी

नगर जिल्ह्यातील बेलवंडी ते शिरूर मार्गावर ढवळगाव येथे एसटी बस व एर्टिका कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यांच्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. गाडीतील सर्व जण श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सूद्रिक येथील रहिवाशी असल्याचे समजते.