कोपर्डी पुन्हा हादरले, विवस्त्र करून मारहाण; दलित तरुणाची आत्महत्या

कोपर्डी येथील हरणवस्ती परिसरातील विठ्ठल उर्फ नितीन  शिंदे (37) या दलित तरुणाला स्मशानात नेऊन विवस्त्र्ा करून मारहाण केल्याची घटना घडली होती. याचा मानसिक त्रास झाल्याने त्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी तिघांना अटक केली. दिनेश उर्फ बंटी बाबासाहेब सुद्रिक, स्वप्नील बबन सुद्रिक, वैभव मधुकर सुद्रिक अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

दोन दिवसांपूर्वी कोपर्डी गावातील तमाशामध्ये नाचण्याच्या कारणावरून विठ्ठल उर्फ नितीन कांतीलाल शिंदे याला तिघांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर गोंधळ निर्माण होऊन तमाशा बंद पडला. त्यानंतर नितीन घरी परतत असताना रस्त्यात त्याला तिघांनी अडवले व गावातील स्मशानभूमीमध्ये नेत विवस्त्र्ा केले, मारहाण केली. त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. दुसऱया दिवशी त्याने आपल्या कुटुंबीयांना निरोप पाठवून कपडे मागून घेतले व त्यानंतर तो घरी आला. या घटनेमुळे नैराश्य आलेल्या नितीनने दुसऱया दिवशी, गुरुवारी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने घडलेल्या घटनेसंदर्भात आरोपींच्या नावे चिठ्ठी लिहिली होती.