पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

पुणे अपघातप्रकरणी आरोपीला फायदा पोहचवण्यासाठी पुणे पोलिसांनी तपासात मुद्दाम अनेक घोळ केले आहेत. पहिल्या एफआयआर मध्ये अनेक त्रुटी ठेवल्या होत्या यावरून पोलिसांच्या कृतीवर शंका उपस्थित होत असल्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी घाटकोपर प्रकरणी एसआयटी नेमली तशी पुण्याच्या प्रकरणात देखील न्यायिक चौकशी करावी अशी मागणी करत पुणे पोलिसांची देखील चौकशी व्हावी, असे वडेट्टीवार यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती?ही दिशाभूल का केली जात आहे? असा सवाल श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.