कॅन्सरच्या शस्त्रक्रियेनंतर राजकुमारी केट मिडलटन पहिल्यांदाच दिसल्या शाही सोहळ्यात

ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विल्यम्स यांची पत्नी प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन गेला काही काळ कर्करोगाने त्रस्त होत्या. मात्र शनिवारी किंग चार्ल्स यांचा वाढदिवस साजरा करण्याकरिता लष्करी परेड आयोजित करण्यात आली होती. ‘ट्रूपिंग द कलर’ या शाही कार्यक्रमात कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच पब्लिक अपिअरंस केला.

मार्च महिन्यात एका व्हिडीओ मेसेजद्वारे त्यांना कर्करोग असल्याचा त्यांनी खुलासा केला. जानेवारीमध्ये केमोथेरपी करिता दोन आठवड्यांहून अधिक काळ त्या रूग्णालयात होत्या. याचवेळी त्यांची पोटाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. तेव्हापासून त्या सार्वजनिक ठिकाणी दिसल्या नव्हत्या. डिसेंबरनंतर पहिल्यांदाच प्रिन्सेस केट यांनी सार्वजनिक पदार्पण केले. केट आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या नसल्या तरी त्यांची तब्येत पूर्वीपेक्षा बरी असल्याचे म्हटले जात आहे.